selu, parbhani, Dr APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 2023 saam tv
महाराष्ट्र

Dr APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 2023 : पिकाे उपग्रह प्रक्षेपण, 'प्रिन्स'च्या विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम

यशस्वी विद्यार्थ्यांचे परभणी जिल्ह्यात काैतुक हाेऊ लागले आहे.

राजेश काटकर

Parbhani News : विझन मारोती खाडे व पूर्वेश अनुप गुप्ता या सेलू (selu) येथील दाेन विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्टुडन्ट सॅटॅलाइट मेकिंग व्हेकिल मिशन 2023 (Dr. APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 2023) मध्ये विश्वविक्रम स्थापित केला. दाेन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सेलु येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिर कॉलेजमध्ये (LKR Rodge Prince English School & Jr. College, Selu) जल्लाेष करण्यात आला.

या मिशनसाठी संपूर्ण देशातून विविध राज्यातून एकूण पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या मिशनमध्ये खाडे व गुप्ता या आठवतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला पिको सॅटॅलाइट तसेच सर्व राज्यातून सहभागी विद्यार्थ्यांनी एकूण 150 पिको सॅटॅलाइट तयार केले. डॉ आनंद मेगालिंगम (स्पेस झोन इंडिया चेन्नई ) डॉ. गोकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली "भारतातील प्रथम हायब्रीड रॉकेट" द्वारे अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपीत करण्यात आला.

या अनोख्या उपक्रमासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सलीम शेख, दाऊद शेख, मार्टिन ग्रुपचे चार्ल्स जोसेफ व स्पेस झोन इंडियाचे सहकार्य लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या (APJKSSLV २०२३) परीक्षेत सुद्धा यश मिळवले. एकूण पाच हजार विद्यार्थ्या पैकी चाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली हाेती. (Maharashtra News)

त्यामध्ये शाळेचा विजय मारुती खाडे याने प्राविण्य मिळवले. पूर्वेश अनुप गुप्ता या विद्यार्थ्यांनेही पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळवला. या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांनी मार्गदर्शन केले. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांनी वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, AKIF शिष्यवृत्ती असे विविध पुरस्कार मिळवले.

फेब्रुवारी २०२१ मागील वर्षी ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विश्वविक्रम प्रस्थापीत केला होता. दरवर्षी सॅटेलाईट व रॉकेट मेकिंग मिशनमध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून आला. या शाळेचे कौतुक देशपातळीवरही होत आहे. यशस्वीतांचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT