मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात गोविंद साळुंके
महाराष्ट्र

मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोविंद साळुंके

अहमदनगर - अहमदनगर Ahmednagar दक्षिण जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या राहुरी Rahuri तालुक्यातील मुळा धरण Dam राम भरोसे असल्याचे चित्र समोर आल आहे. राज्यातील अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर असताना मुळा धरणाची सुरक्षा Security मात्र धोक्यात आली आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा Rain जोर वाढू लागला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक देखील वाढत आहे. परंतु धरण परिसरात अंधार आहे. पाण्याची लेवल पाहण्याकरिता देखील येथे लाईट नसल्याने मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात असल्याचे चित्र समोर आल आहे.

हे देखील पहा -

मुळा धरणावर जाताना सुरुवातीला पोलीस चौकी आहे. चौकीला देखील लाईटची व्यवस्था नाही चौकीमध्ये एक पोलीस आणि पाटबंधारे विभागाचा एक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात मात्र लाईट नसल्याने मुळा धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. सर्वत्र अंधार असल्याने या ठिकाणी अनेक वेळा बिबट्याने दर्शने दिल आहे.

या परिसरात अनेक वन्यप्राणी असून त्या प्राण्यांपासून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका आहे. धरण अधिकाऱ्यांना याची माहिती असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाचे दिवस सुरू आहे. धरणामध्ये दिवसागणिक पाण्याची आवक वाढत आहे. धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी पाण्याची लेवल पाहण्याकरिता धरणात उतरावे लागते मात्र धरणावर सर्वत्र अंधार असल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT