mahayuti  Saam tv
महाराष्ट्र

Mahayuti Politics : महायुतीत जागांसाठी रस्सीखेच; जागावाटपात शिंदेसेनेचा वेगळाच फंडा, VIDEO

mahayuti political news : महापालिका निवडणुका जाहीर होताच..महायुतीत जागावाटपावरून चांगलाच रस्सीखेच सुरु झालाय.. अशातच शिंदेसेनेनं जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात नवी रणनीती आखलीय... शिंदेसेनेची रणनीती नेमकी काय आहे? महायुतीत तणाव का वाढलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नगरपालिकेच्या निवडणुकीत चांद्यापासून बांद्यापर्यंत शिंदेसेनेचा डंका वाजला... या विजयानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेनं नव्या उत्साहात सज्ज झालीय..मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेसेनेचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात शिंदेसेनेनं वेगळाच फंडा वापरण्याचा निर्णय घेतलाय...

विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट 80 टक्के होता.. त्यामुळे महायुतीत शिंदेसेना 125 जागांवर ठाम असून भाजपनं 90 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे... तर दुसरीकडे शिंदेसेनेने जास्त जागांपेक्षा निवडून येणाऱ्या जागा घेण्याचं धोरण ठरवलयं...तिकिट वाटप करताना इच्छुक उमेदवाराच्या कामगिरीच्या जोरावर त्याला उमेदवारी दिली जाणार आहे...

दरम्यान 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या आणि निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवरही भाजपने दावा केलाय... इतकंच नव्हे तर 2017 साली भाजप ज्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होता तिथेही भाजपनं आपला दावा कायम ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...त्यामुळे भाजप जागावाटपात आक्रमक असताना शिंदेसेनाही आक्रमक झालीय...

दुसरीकडे महायुतीचं जवळपास 180 जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आलीय.. त्यात 30 ते 40 जागांवरील पेच लवकर सुटणार आहे... उर्वरित जागांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा चर्चा होणार आहे... मात्र शिंदेसेनेची नवी रणनीती भाजपला पटणार का? जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

Hrithik Roshan: हृतिक रोशनसोबत काकाच्या लग्नात थिरकले रेहान-रिदान; चाहते म्हणाले, 'बापाप्रमाणेच दोन्ही मुलं...'

Contrast Necklace Designs: गुलाबी साडीवर कोणत्या रंगाचा कॉन्ट्रास्ट नेकलेस दिसेल शोभून?

SCROLL FOR NEXT