नाशिकमध्ये सुरु केल्या शाळा; मात्र कोरोनामुळे त्यांना पुन्हा लावला टाळा!
नाशिकमध्ये सुरु केल्या शाळा; मात्र कोरोनामुळे त्यांना पुन्हा लावला टाळा! Saam Tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये सुरु केल्या शाळा; मात्र कोरोनामुळे त्यांना पुन्हा लावला टाळा!

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नाशिकमध्ये शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यातील पाच शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. या 5 शाळांमधील काही शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबधित आढळल्यानं या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. Schools started in Nashik were closed again due to Corona

मागील जवळपास दोन वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालय बंदच आहेत. यामध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येवून गेल्यावरती आणि लसीकरणालाVaccination सुरुवात झाल्यानंतर बऱ्यापैकी कोरोनाची परिस्थिती काही ठिकाणी आटोक्यात आली होती. आणि याच पार्श्वभूमीवर ज्या गावात मागील महिनाभरात एकही कोरोना रुग्ण CoronaPatient नाही अशा गावांमध्ये शासनाने शाळाSchool सुरु करा असे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे जिल्हा परिषदेनं सुरू केलेल्या नाशिक जिल्ह्यातील 5 शाळा सुरु केल्या होत्या मात्र आता त्या पुन्हा बंद कराण्याची वेळ आली आहे. ज्या गावात मागील महिनाभरात एकही कोरोना रुग्ण नाही, अशा ठिकाणच्या राज्य शासनाच्या आदेशानुसारorder State Government सर्व नियमांचं पालन करत 8 वी ते 12 वी पर्यंतच्या 277 शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.

मात्र अवघ्या 10 ते 15 दिवसांतचं सिन्नर तालुक्यातील भोकणी आणि निर्हाळे, देवळा तालुक्यातील डोंगरगाव आणि माळवाडी, मालेगावमधील चिखलओहोळ, निफाडमधील सारोळेथडी आणि त्र्यंबकेश्वरTrimbakeshwar तालुक्यातील अंजनेरीच्या शाळेतील काही शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबधित आढळून आल्यानं या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान या रुग्णांचे अहवाल निगेटिव्हNegative आल्यानंतर या शाळा सुरू होऊ शकतील. मात्र त्यासाठी किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार आहे.

तसेच गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कोरोनाचा काहीसा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचं ग्रहण शाळा आणि शिक्षणाला लागलेलं पाहायला मिळतंय. हे जर असच सुरू राहिलं, तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षणाला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT