school open saam tv
महाराष्ट्र

Aurangabad: ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आजपासून औरंगाबाद शहरातील दहावी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या (Task Force) बैठकीत आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा २४ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचे आदेश वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले होते. (Aurangabad School Latest Update)

हे देखील पहा -

मात्र स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घ्यावे असेही या आदेशात वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत उद्यापासून पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ४,६०२ शाळा, महाविद्यालयात पहिली ते बारावीचे वर्ग चालवले जातात. त्यापैकी ३६२९ शाळा ग्रामीण भागात आहेत तर ९७३ शहरात. तर ग्रामीण भागात १,३४७ गावांपैकी १६९ गावांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाही त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT