School Update : बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा घुमणार चिमुकल्यांचा किलबिलाट! SaamTVNews
महाराष्ट्र

School Update : बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा घुमणार चिमुकल्यांचा किलबिलाट!

सोमवारपासून बीड जिल्ह्यातील 3 हजार 500 शाळा 100% क्षमतेने होणार सुरू...

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट गुंजणार आहे. येणाऱ्या सोमवारपासून बीड (Beed) जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच शाळा 100% क्षमतेने सुरू होणार आहेत. असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

हे देखील पहा :

कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यातील सर्वच शाळा (School), महाविद्यालये (Colleges) बंद करण्यात आली होती. मात्र, त्यांनतर आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आणि महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. तर 1 ली ते 8 वी पर्यतच्या शाळा बंद होत्या. मात्र, आता बंद असणाऱ्या शाळा पुन्हा एकदा उघडणार असून चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या (ZP School) 2 हजार 480 शाळा आणि इतर अशा एकूण जवळपास साडेतीन हजार शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात.अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Working women's Jewellery: वर्किंग वुमनसाठी शानदार प्लॅटिनम दागिने, फॉर्मल लूकही करतील खास

घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?

Maharashtra Live News Update: पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत असल्याचा निर्णय स्वागतार्ह – मनोज जरांगे

युद्धाचा भडका! एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले, पाकिस्तानचे १० सैन्य ठार; ३७ बंडखोरांचाही खात्मा

Pudachi Wadi Recipe: रोज कोथिंबीर वडीच कशाला? विदर्भ स्पेशल पुडाच्या वडीची रेसिपी लगेचच घ्या नोट करुन

SCROLL FOR NEXT