School Uniform 
महाराष्ट्र

School Uniform: फाटका गणवेश, फडतूस व्यवस्था; ओवरसाईजची आऊटफीटची शिक्षण विभागाला क्रेज?

School Uniform: शालेय विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विभागानं चेष्टा चालवली की काय अशी घटना घडली. सरकार कडून देण्यात येणाऱ्या गणवेशाची अवस्था पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. मस्तवाल शिक्षण विभागानं शालेय विद्यार्थ्यासोबंत कशी थट्टा केलीये पाहा, सविस्तर सामच्या या रिपोर्टमध्ये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या ओव्हरसाईज कपड्यांची फॅशन ट्रेंन्डमध्ये आहे. आणि याच ट्रेन्डचं क्रेज हे शिक्षण विभागाला आहे असं म्हटलं तर कदापि चुकीचं ठरणार नाही. त्याला कारण आहे. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना दिलेला हा गणवेश.

हा गणवेश नीट पहा

हाच गणवेश विद्यार्थ्यांना सरकारच्या शिक्षण विभागानं दिलाय.

एकाद्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरलाही लाजवेल असा हा गणवेश.

ढिगळं लावलेला हा गणवेश.

चिंध्या जोडून तयार केलेला हा गणवेश.

फाटलेला, उसलेला हा मुलींचा गणवेश.

कापडाचा दर्जा तर अगदी सुमार.

या गणवेशांचे खिसे पहा.

हे खिसे पाहील्यानंतर नक्कीच कोणाचे तरी खिसे भरण्यासाठी हे पाप शिक्षण विभागानं केलं का? असा प्रश्न उपस्थित होतो.

राणाभीमदेवी थाटात विद्यार्थ्यांना गणवेश देणार अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली. पण ही घोषणा इतकी फुसकी आणि फसवी असेल अशी कल्पनाही या चिमुरड्यांनी केली नसेल. छत्रपती संभाजीनगरात अर्ध शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले खरे पण हे गणवेश होते की धान्याचे पोते असा प्रश्न पालकांना पडलाय. या गणवेशाची अवस्था बघून संताप व्यक्त करण्यात येतोय. विदयार्थांची फसवणूक या सरकारनं केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.

माप न घेता हे गणवेश तयार केल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितल्यानंतर शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित होतायेत. हा गणवेश एक तरी नेता आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना घालू शकेल का असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात उपस्थित झाला असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांशी प्रतारणा करणाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT