school shed collapsed in koregoan satara rain  Saam Digital
महाराष्ट्र

साताऱ्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस, आनेवाडीनजीक होर्डिंग काेसळले; वाघोली जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेले

Satara Latest Marathi News : अचानाक आलेल्या पावसामुळे सातारा बस स्थानकात देखील पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत नागरिकांची एकच धांदल उडाली.

ओंकार कदम

सातारा जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीसह काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दाेन दिवस झाले साता-यासह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होत होते. पण अखेर काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह साताऱ्यात पावसाला सुरवात झाली. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेचे काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शाळेचे असलेले पत्रेच या पावसात उडून गेले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही पण पावसाने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सातारा बस स्थानकात देखील पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

आनेवाडीत होर्डिंग काेसळले

आनेवाडी टोल नाक्यासह भुईंज ते लिंब फाटा परिसरात धोकदायक होर्डिंग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले. साेमवारी संध्याकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व पडत असलेल्या मुसळधार पावसाने मोठे होर्डींग अचानक कोसळल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT