School Bus Fees meta ai
महाराष्ट्र

School Bus Fees : पालकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI द्वारे भरता येणार नाही? मोठी अपडेट समोर

Parents Alert : १५ ऑक्टोबरपासून स्कूल बस फीच्या नियमात मोठा बदल होणार आहे. पालकांनी चेक, क्रेडिट कार्ड आणि शाळेच्या अधिकृत सूचनांची माहिती घ्यावी.

Sakshi Sunil Jadhav

पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता मुलांच्या शाळेच्या बसची फी भरताना UPI पेमेंटचा वापर करता येणार नाही. १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने दिली तर ती स्वीकारली जाणार नाही, असा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर आकारली जाणारी फी हे यामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं बस व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पालकांना बसची फी भरण्यासाठी चेक किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय वापरावा लागू शकतो.

UPI पेमेंटवर शुल्क आकारले जात असल्याचा दावा

सध्या अनेक पालक शाळेची बस फी भरण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करतात. मात्र, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर पेमेंट गेटवेकडून फी आकारली जात असल्याचा दावा स्कूल बस व्यवस्थापनाने केला आहे. काही व्यवहारांसाठी २०० रुपये शुल्क आकारलं जात असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे.

शाळेची सहा महिन्यांची बस फी अनेकदा दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असते. त्यामुळे प्रत्येक व्यवहारामागे जास्तीचे शुल्क भरावं लागत असल्यामुळे शाळांवरचा आर्थिक भार वाढू शकतो. याच कारणामुळे UPI पेमेंट स्वीकारणं थांबवलं पाहिजे असं व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे.

पालकांनी फी कशी भरावी?

स्कूल बस ओनर्स असोसिऐशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांच्या म्हणण्यांनुसार, पालकांनी बसची फी UPI ऐवजी धनादेश किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने भरावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. पण हा निर्णय संबंधित बस व्यवस्थापनाने घेतल्याचं सांगितलं जात असून, सर्व शाळांमध्ये एकसारखा नियम लागू आहे का, याची पालकांनी संबंधित शाळेकडून खात्री करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood vessel disease: धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं होतं मोठं नुकसान, शरीरात दिसू लागतात ही धोक्याची लक्षणं; वेळीच सावध व्हा!

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर कलम १६३ लागू; दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Railway News : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दादरपर्यंत थांबणाऱ्या 'या' ३ ट्रेन आता सीएसएमटीपर्यंत धावणार

ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? दसऱ्यानंतर 'या' तारखेला लागणार निकाल; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्यांवर समाधान निघणार? रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर, DRM च्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT