pritish deshmukh  saamtv
महाराष्ट्र

घोटाळेबाज प्रीतीश देशमुखला आमदार व्हायचं होतं; 32 वर्षांच्या वयात जमविली कोट्यवधींची माया!

अटकेमुळे विवाह आला अडचणीत! प्रितीशला महागड्या गाड्यांचा छंद, कारच्या फॅन्सी नंबर साठी 8 लाख रुपये भरले!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा मूळचा वर्ध्याचा रहिवासी आहे. वर्धेतील त्याच्याशी संबंधित विविध गोष्टी बाहेर येताहेत. वर्धेतही मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्याला राजकारणात मोठी रुची असल्याची माहिती पुढं आलीय. मुंबईवारीवर असलेल्या वर्धेच्या नेत्यांना त्यानं विधानपरिषद आमदार बनन्याची इच्छा असल्याचही बोलून दाखवली असल्याचीही चर्चा आहे.

डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख (Pritish Deshmukh) याचे वर्धा शहरातील सेवाग्राम मार्गावरील स्नेहलनगर भागात आलिशान घर आहे. त्याचे वडील वर्धा शहरालगतच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक होते. अत्यंत हुशार आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ते अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. मूळचे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील असलेले हे देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. कोरोना काळात प्रितीश देशमुखच्या वडिलांचा मृत्यु झाला.

डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे वर्ध्यातील स्नेहलनगर परिसरात मोठे आलिशान ‘राजवाडा’ नामक निवासस्थान आहे. त्यानं घरासमोरील एका लेआऊटमध्ये तब्बल 8 हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. स्नेहलनगर परिसरात असलेल्या डॉ.देशमुख याच्या निवासस्थानी त्याच्या आईची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्याच्या आईने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. सुरक्षा रक्षकाने त्यांची प्रकृती बरी नसल्यानं त्या बोलू शकत नसल्याचं सांगितलं. डॉ.प्रीतीश देशमुख हा दोन महिन्यातून वर्ध्यातील (wardha) त्याच्या निवासस्थानी यायचा. आठ ते दहा दिवस राहून तो परत पुण्याला जायचा. मात्र, त्यानं अल्पावधीतच एवढी माया कशी जमवली, याबाबत नागरिकही आर्श्चय व्यक्त करीत होते.

वर्ध्यात कुठल्याही राजकीय मंडळींशी प्रितीशचे विशेष संबंध नसले नव्हते. मात्र, मुंबईत येणाऱ्या वर्धेच्या नेत्यांना त्यानं विधानपरिषद आमदार (MLC) बनन्याची इच्छा बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. त्याला महागड्या गाड्यांचा छंद आहे. त्याच्याकडे 6 महागड्या कार आहेत. 9 नंबर हा त्याचा लकी नंबर आहे. मर्सर्डिज कार (car) वर या नंबर साठी त्यानं आरटीओ कडे तब्बल 8 लाख रुपये भरले होते. त्यातूनच त्याच्याकडे किती माया असेल याचा अंदाज येतो.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT