Supreme Court Saam Digital
महाराष्ट्र

SC vs Kolkata HC: लैंगिक इच्छांवर नियंत्रणाबाबतच्या कोलकाता HC च्या टिप्पणीवर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी

SC vs Kolkata HC: किशोरवयीन मुलींनी आपल्या 'शारीरिक इच्छांवर' नियंत्रण ठेवावे, अशी टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

Sandeep Gawade

SC vs Kolkata HC

किशोरवयीन मुलींनी आपल्या 'शारीरिक इच्छांवर' नियंत्रण ठेवावे, अशी टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. निर्णय देताना न्यायाधीशांनी आपली वैयक्तिक मते नोंदवणे किंवा उपदेश देणे अपेक्षित नाही, असेही कोर्टाने नमूद केले. उच्च न्यायालयाची टिप्पणी हे केवळ अनावश्यक आणि आक्षेपार्हच नाही, तर अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे हनन आहे, अशी कठोर टिप्पणीही कोर्टाने यावेळी केली.

१८ ऑक्टोबर २०२३ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ केल्याच्या खटल्यात हा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या मलाची पोक्सो कायद्यांतर्गत आरोप असलेल्या मुलाची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायाधीश चित्तरंजन दास आणि पार्थसारथी सेन यांनी परस्पर संमतीने हा निर्णय दिला होता. तसेच या खटल्यादरम्यान त्यांनी तरुणांना अनेक उपदेशही केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किशोरवयीन मुलींनी आपल्या शारीरिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे. दोन मिनिटांच्या या आनंदाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तसेच मुलांनीही मुलींच्या प्रतिष्ठेचा आदर करावा, असा उपदेश उच्च न्यायालयाने केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने या प्रकरणात मदत करण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणावरून न्यायालयाने प. बंगाल सरकारला आणि खटल्यातील इतर पक्षांना नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT