Court, Dharashiv, Osmanabad saam tv
महाराष्ट्र

Bombay High Court Order : धाराशिव नव्हे उस्मानाबाद, जाणून घ्या मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

शासकीय कार्यालयांना आदेश देण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे 

Dharashiv News : पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी धाराशिव नावाचा वापर करू नये उस्मानाबाद नावाचाच वापर करावा असा आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना केला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद असाच उल्लेख करावा लागणार आहे. (Maharashtra News)

उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन धाराशिव करण्याबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल आहे. नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालु आहे. असे असताना महसुल व इतर विभागांशी संबधित कार्यालये हे जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचीकाकर्ते यांच्या वकीलांनी न्यायालयास (court) नुकतची निर्दशनास आणुन दिली.

त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर कोणत्याही कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी धाराशिव नावाचा वापर करू नये.

उस्मानाबाद नावाचाच वापर करावा असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद असाच उल्लेख करावा लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shadashtak Yog: मंगळ-शनी मिळून बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींचा होणार कायापालट, धनलाभ होणार

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून डोळे भिरभिरतील

Maharashtra News Live Updates: एसटी बसच्या अपघातात सातत्याने वाढ, वर्षभरात 3 हजार 381 अपघात

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

Gokul Milk Price: शेतकऱ्यांना मोठा धक्का! गोकुळ दूध खरेदीत ३ रुपयांनी कपात

SCROLL FOR NEXT