Thane News: राहुल गांधींनी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात भाजप आणि शिवसेना सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. मुंबईत दादर, अंधेरी, वांद्रे आणि ठाण्यात अंधेरी आणि वांद्रे यात्रेला सुरुवात झाली. सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा व शिवसेना(शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे.
या गौरव यात्रेत भाजपा (BJP) व शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. (Latest Marathi News)
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून निघालेली भाजप- शिवसेनेची सावरकर यात्रेची डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेत सहभागी समुदयाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे...
"सावरकर हे प्रखर देशभक्त होते, त्यांचे कार्य पोहचवण्यासाठी ही यात्रा आहे. या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग आणि अपमान वारंवार होत आहे त्याची चीड सर्वत्र दिसत असल्याचे," मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच एक दिवस तरी तुम्ही सेल्युलर जेलमध्ये राहणार का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.ए
तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "हे सर्व सामान्यांचे सरकार असून कोणताही आमदार, खासदार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही," असा इशाराही यावेळी दिला आहे.
दरम्यान, एकीकडे भाजप शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा सुरु झाली असतानाच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या या टीकेला महाविकास आघाडी कशी उत्तर देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे... (Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.