satej patil, rajaram sahakari sakhar karkhana election latest news , mahadev mahadik saam tv
महाराष्ट्र

Satej Patil News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला महाडिक भ्याले... सतेज पाटलांचा घणाघात

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election in Kolhapur: या लढ्यात हसन मुश्रीफ ही आमच्या बाजूने आहेत. सभासदांना कारखान्यात प्रवेश का दिला जात नाही ? असा सवाल सतेज पाटलांनी उपस्थित केला आहे.

Siddharth Latkar

Kolhapur Latest News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Latest Updates) आमदार सतेज पाटील (mla satej patil) यांच्या गटाचे 29 उमेदवारांच्या अपात्रतेच्या अपिल फेटाळल्याने पाटील गट आक्रमक झाला आहे. हा निर्णय देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली आहे. या प्रक्रियेत भाजपचा दबाव होता असा आराेप करीत पाटील यांनी या निर्णया विराेधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. (Breaking Marathi News)

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आज काेल्हापूरात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी सतेज पाटील बाेलत हाेते. ते म्हणाले आमच्या आघाडीच्या उमेदवारांचे अपील नामंजूर करण्यात आले. हा निकाल रविवारी रात्री १२ वाजता संबंधितांना देण्यात आला. यावरुन महाडिक कंपनी भ्याली आहे असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.

सतेज पाटील म्हणाले लोकांच्या मनात राग आहे. त्यांच्या हातात दफ्तर आहे. तेच कारखान्याचे मालक होणार. आता हा निर्णय राज्यातील सर्व साखर कारखान्यांना लागू होणार असल्याची टिप्पणी पाटील यांनी केली.

ते म्हणाले या निर्णयाच्या विराेधात आम्ही हायकोर्टात जाणार आहे. आमची लढाई कारखान्याच्या खासगीकरणा विरोधात आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा ही आमची मागणी असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या प्रकरणाचा निकाल अधिकाऱ्यांनी केवळ कॉपी पेस्ट केला आहे. ही ऑर्डर रात्री का दिली ? सकाळी का दिली नाही ? असा सवाल करीत या सगळ्या प्रकरणावरून एकच की महाडिक भ्याले आहेत असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.

आम्हाला सभासदांचा चांगला प्रतिसाद आहे. 28 वर्षांनंतर महाडिक सभासदांच्या दारात फिरत आहे. गेल्या 28 वर्षांत हे का गेले नाही असा सवाल पाटील यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT