Satara politics  Saamtv
महाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट; त्रिशंकू निकाल, शिंदेसेना करणार भाजपचा गेम?

Satara politics : सातारा जिल्हा परिषदेच्या निव़डणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय... अशातच शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जातेय... मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना नेमकी कोणती रणनिती आखतेय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर साताऱ्याच्या गादीचा मान नेमका कुणाला मिळणार?कारण निकालानंतरच्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेची गणितं गुंतागुंतीची झालीयत...जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मॅजिक फिगर गाठताना भाजपची दमछाक होतेय...त्याचवेळी भाजपच्या विरोधात पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्यात.. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20, शिंदेसेनेला 15 काँग्रेसला 1 तर अपक्षांना 2 जागा .. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आल्यास 33 हा बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य आहे...

साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपला रोखण्यासाठी का प्रयत्न करत्येय..तर ...साताऱ्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती नगरपालिका निवडणुकीत. नगरपालिका निवडणुकीत भाजपनं स्वबळाचा नारा देत वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला... तर वाई नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकवत मकरंद पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह दिला.

दुसरीकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री शंभूराजे देसाई यांनाही टार्गेट करण्यात आलं... ..यासंदर्भातच निवडणुकीआधी मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यात चर्चा झाली.त्यामुळे आता निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाऊ शकते.

त्यामुळे निवडणुकीआधी घेतलेली बैठक आणि आता आलेले निकाल यामुळे मंत्री मकरंद पाटील, शंभूराजे देसाई आणि रामराजे नाईक-निंबाळकर ही त्रयी आता एकत्र येऊन भाजपला धोबीपछाड देणार का ? एवढंच नाही तर मित्रपक्षांमधील हा अंतर्गत कलगीतुरा जिल्ह्याच्या सत्तेचे समीकरण कुणाकडे झुकवतो, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT