BJP leaders celebrate after winning all committee chairperson posts unopposed in Satara Zilla Parishad. Saam Tv
महाराष्ट्र

आधी राजकीय ड्रामा, नंतर बहिष्कार नाट्य; साताऱ्यात युती फुटली, पडद्यामागं काय काय घडलं?

Satara Zilla Parishad Chairman Election Controversy: सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरून महायुतीत मोठा वाद उफाळला असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठल्याचे पहायला मिळाले.भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. यानंतर घटनेनंतर साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी,शिवसेना संघर्ष पेटला आहे.या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर त्याचा विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात वाक्युद्धं रंगले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठल्याचे पहायला मिळाले. भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. यानंतर घटनेनंतर साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना संघर्ष पेटला आहे. या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर त्याचा विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात वाक्युद्ध रंगले आहे.

या घटनेनंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.मंत्री शंभूराज देसाई यांनी सभापती निवड झाली म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं होत नाही. कालावधी पाच वर्षाचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा इशारा मंत्री देसाई यांनी केला आहे.

मंत्री मकरंद पाटील यांनी देखील राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात ... आज आमचे सदस्य जरी फोडले असले तरी ही वेळ त्यांच्यावर येणार आहे.. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात 50 ते 60 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे शंभर टक्के याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे.

मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टीकेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले आहे.मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हा परिषदेत आमचं बहुमत असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक सत्ते पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आमचाच होणार.आज त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे सिद्ध झालं आहे असा टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.

मंत्री शंभूराज देसाई आरोप आमच्यावर करतात आणि धमकी देखील तेच देतात हे सातत्याने घडल आले आहे. आताही ते म्हणत आहेत अजून पाच वर्ष आहेत तर आम्हीही ते बघायलाच बसलो असल्याचे सडेतोड उत्तर यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. एकूणच आता सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून महायुतीमध्येच जिल्ह्यामध्ये मोठे दरार पडल्याचा पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे दोन मंत्री शिवसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे एक असे एकूण चार मंत्री महायुतीमध्ये आहे त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव देखील दरे आहे. असे असताना जिल्हा परिषद मध्ये झालेल्या राहण्यामुळे आता मोठी ताकद असून सुद्धा सातारा जिल्ह्याच्या भविष्याच्या राजकारणामध्ये महायुती त एकमेकांचे पाय ओढताना आपल्याला पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

SCROLL FOR NEXT