satara zilla krida puraskar 2023 to rohan gujar, saurabh gaikwad, sudeshna shivankar saam tv
महाराष्ट्र

Sports Awards 2023 : सातारा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर; राेहन गुजर, सुदेष्णा शिवणकर, साैरभ गायकवाड, नवनाथ बिडगर, संस्कृती माेरेचा सन्मान

आदिती स्वामी हिचा उद्या (ता. 26 जानेवारी) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.

Siddharth Latkar

Satara Sports Awards :

सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आज (गुरुवार) जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023 ची घाेषणा केली. बास्केटबाॅल प्रशिक्षक राेहन रणजीत गुजर यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, धावपटू सुदेष्णा हणमंत शिवणकर यांना गुणवंत खेळाडू (महिला प्रवर्ग), बेसबाॅलपटू साैरभ महादेव गायकवाड यांना गुणवंत खेळाडू (पुरुष प्रवर्ग), मैदानी क्रीडा प्रकारातील खेळाडू नवनाथ सुखदेव बिडगर यांना गुणवंत खेळाडू (दिव्यांग प्रवर्ग) तसेच बुद्धीबळपटू संस्कृती विकास माेरे यांना गुणवंत खेळाडू (दिव्यांग प्रवर्ग, थेट पुरस्कार) पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. (Maharashtra News)

जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी दिलेल्या माहितीनूसार समितीने गुणानुक्रमे या पुरस्कारार्थींची निवड केली आहे. या पुरस्कार्थींपैकी साता-याचे बास्केटबाॅलचे जनक (कै.) रणजीत गुजर (ranjit gujar) यांचे चिंरजीव राेहन गुजर (rohan gujar) यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील एकूण 31 खेळाडू घडविण्याचे कामगिरी बजावली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धावपटू सुदेष्णा शिवणकरने (sudeshna shivankar) राज्य, राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. तिने काेलंबियातील 20 वर्षाखालील जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत देखील देशाचे प्रतिनिधित्व केले.

बेसबाॅलपटू साैरभ गायकवाडने (saurabh gaikwad) वरिष्ठ राष्ट्रीय बेसबाॅल स्पर्धेत सुवर्णपदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले आहे.

15 व्या पॅरा मैदानी अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या नवनाथ बिडगर तसेच 4 थ्या आशियाई महिला दिव्यांग बुद्धीबळ स्पर्धेत कास्यपदक मिळविलेल्या संस्कृती माेरेचा पुरस्कार्थींमध्ये समावेश आहे.

उद्या (ता. 26 जानेवारी) सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या हस्ते छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल येथे सकाळी सव्वा नऊ वाजता ध्वजवंदन हाेईल. त्यानंतर अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती गाेपीचंद स्वामी (archer aditi gopichand swami) हिचा विशेष सत्कार करण्यात येईल. त्यानंतर सातारा जिल्हा क्रीडा पुरस्काराचे (satara zilla krida pursakar) वितरण हाेईल अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT