Satara Shocking Saam tv
महाराष्ट्र

Satara Shocking : तीच मुलगी अन् तोच मुलगा, याआधीही हल्ल्याचा प्रयत्न; साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, धक्कादायक VIDEO

Satara Shocking update : साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला झाल्याची घटना घडलीये. बसाप्पा पेठ करंजे परिसरात ही घटना घडली आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा : साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून युवकाने अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. सातारा शहरातील बसाप्पा पेठ करंजे परिसरात ही घटना घडली आहे. एका शालेय अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला झाला आहे. शाळकरी मुलीवर झालेल्या चाकूहल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील बसाप्पा पेठ करंजे परिसरात एका शालेय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावला. त्यानंतर या माथेफिरू युवकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेने शाळा परिसरात एकच खळबळ उडाली.

रस्त्यावरील शेजारी लोकांनी युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित माथेफिरू युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या हातात चाकू असल्याने युवतीच्या जीवास धोका असल्याचे ओळखले. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत युवकास ताब्यात घेतलं. यावेळी जमावाने संबंधित युवकाची चांगलीच धुलाई केली.

संबंधित युवकाकडून याआधी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या या युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

माथेफिरू युवक शाळा परिसरात आला. त्यानंतर त्याने मुलीच्या गळाला चाकू लावला. त्यानंतर मुलीने मदतीसाठी याचना केली. माथेफिरु युवकाच्या कृत्याने सारेच हादरले. त्यानंतर घटनास्थळी काही पोलीस साध्या वेशात होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मुलीला माथेफिरुच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर या माथेफिरूची लोकांनी चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT