Satara Student Ends Life Saam Tv
महाराष्ट्र

वयानं मोठ्या तरूणीवर जीव जडला; १७ वर्षीय मुलानं वडिलांना सुसाईड नोट पाठवून आयुष्य संपवलं

Satara Student Ends Life: साताऱ्यात विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल. आत्महत्येपूर्वी वडिलांना व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली अन् आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

साताऱ्यातील डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरण ताजे असताना, आता एका विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अभ्यासाचा ताण आणि आपल्याहून वयाने मोठी असणाऱ्या तरूणीनं नकार दिल्यामुळे विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं. आत्महत्यापूर्वी तरूणानं वडिलांना व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. नंतर आयुष्य संपवलं. सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संबंधित मुलगा मूळचा साताऱ्यातील पाटण तालुक्यातील रहिवासी. साताऱ्यातील वसतिगृहात राहत होता. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तरूण गावी गेला होता. सुट्टी संपल्यानंतर तो पुन्हा वसतिगृहात परतला. मध्यरात्री त्यानं एक चिठ्ठी लिहिली आणि वडिलांना पाठवली. व्हॉट्सअॅपवर त्यानं चिठ्ठी पाठवली. वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मेसेज पाहिला. मुलाच्या वडिलांनी तातडीने कॉलेजवर फोन करून मुलाबाबत विचारपूस केली.

तेव्हा विद्यार्थ्यानं आत्महत्या केली असल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सांगितले की, तरूणाचे त्याच्याहून वयानं मोठ्या असलेल्या युवतीवर प्रेम होते. मात्र, कुटुंबियांकडून प्रेमाला विरोध होईल, अशी भीती त्याच्या मनात होती.

प्रेमप्रकरण तसेच त्याला अभ्यासाचा देखील ताण होता. या दोन्ही तणावाखाली येऊन मुलानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यानं आधी वडिलांना चिठ्ठी लिहून पाठवली. नंतर टोकाचं पाऊल उचललं. सातारा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठवलं. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, कमी वयात मुलानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

SCROLL FOR NEXT