Satara, RPI Andolan saam tv
महाराष्ट्र

एकनाथ काका, अजित काका, देवेंद्र काका, शंभू काका आम्ही आलाे... शाळेच्या गणवेशात अवतरले RPI चे कार्यकर्ते; अनाेख्या आंदाेलनाची अख्या साता-यात चर्चा

शाळेच्या गणवेशात अवतरले आरपीआयचे आंदाेलक,

ओंकार कदम

Satara News : महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत घेतलेला निर्णय शैक्षणिक क्षेत्रास धाेकादायक असल्याचा दावा करीत आज (मंगळवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साता-यात आंदाेलन छेडले. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या गणवेशात केलेल्या आंदाेलन लक्षवेधी ठरले. (Maharashtra News)

यावेळी आंदाेलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर कविता सादर करत बाेचरी टीका केली. साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांना देखील आरपीआयचे पदाधिकारी यांनी टिकेचे लक्ष केले.

नेहमीच खादीच्या कपड्यात असणारे आरपीआयचे पदाधिकारी आज शाळेच्या गणवेशात जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या दालनाच्या बाहेर बसून पदाधिका-यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला. यावेळी आंदाेलकांनी सांग सांग भाेलानाथ या चालीवर सांग सांग एकनाथ शाळा टिकेल काय...असा सवाल केला.

या आंदाेलनात अप्पा तुपे, पूजा बनसोडे या पदाधिका-यांसह आरपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. या अऩाेख्या आंदाेलनाची चर्चा समाज माध्यमात तसेच शहारातील चाैक चाैकात सुरु हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT