Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara News : सातारकरांना जाब द्यावा लागेल : शिवेंद्रराजे; विचारांची उंची कधी वाढणार, सातारकरांना कुतुहल : उदयनराजे

साता-याचे राजे पुन्हा एकमेकांवर टीका करु लागलेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) पालिकेच्या निवडणुकीपुर्वीच पुन्हा एकदा आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendrasinhraje Bhosale) आणि खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांच्यात एकमेकांवर टीकासत्र सुरु झाले आहे. पालिका निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी सुरु असल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंवर (Udayanraje Bhosale News) करीत विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असेही म्हटलं आहे. त्यावर उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale news) यांचे नाव न घेता कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे असा टाेला लगावला आहे. (Satara Latest Marathi News)

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले कास धरण (Kass Dam) उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून दादांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त पाहावेच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे.

आता पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे यांची दिल्लीत निवेदने देवून फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु केल्याची टीका आमदार भोसलेंनी उदयनराजेंवर केली आहे. विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उदयनराजेंचे प्रत्युत्तर

कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे. आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. सार्वजनिक कामात बाप दाखवा नाहीतर श्राध्द कर अथवा एक घाव दोन तुकडे करण्याची भुमिका घेण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे असे प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भाेसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केलेल्या टीकेवर शिवेंद्रसिंहराजेंचे नाव घेता दिलं आहे. उदयनराजे म्हणाले लोकहित लक्षात घेवून आम्ही एखादा प्रश्न घेवून कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहीती दिली तर त्यात वावगं काहीच नाही.

ते कधी सार्वजनिक प्रश्न घेवून कोणाकडे जात नसतील आणि जरी गेले तरी त्यात स्वार्थाचा मतितार्थ अधिक असेल तसेच त्यांना कोणी मंत्री महोदय भेटीसाठी कदाचित उभं करत नसतील. या कारणामुळेच खासदार उदयनराजेंना कोणताही मंत्री कसा इतका वेळ देतो, मला तसा वेळ कोणीच का देत नाही अशी सल त्यांना बोचत आहे. त्यांनी आमच्या असुयेपोटीच गरळ ओकलेली आहे. त्याला फार महत्व देत नाही. तसेच भ्रष्टाचार आणि स्वार्थांध विचाराने बरबटलेल्यांनी भ्रष्टाचाराबाबत आरोप करणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल असं उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT