साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीत राडा
महेश शिंदेंचं ‘फ्रस्ट्रेशन’ विधान
भाजप-शिवसेना आमनेसामने
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान वाद उफाळून आला. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. याचदरम्यान भाजपचे नेते महेश शिंदेंनी या राड्याप्रकरणी मोठं विधान केलंय. घडलेला प्रकार हा नेत्यांच्या फ्रस्ट्रेशनमधून झाल्याचं विधान केले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्यावेळी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नेते आमनेसामने आले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे शिवसेना आमदार महेश शिंदे यांची पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी सदस्यांच्या जमवण्याचं संपूर्ण नियोजन केले. त्यांना जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसलेंचे मार्गदर्शन लाभले. या नियोजनाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि दोन्ही राष्ट्रवादीचा गेम झाला.
शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील हे दोन्ही मंत्री जिल्हा परिषदेच्या आवारात उपस्थित असतानाही आघाडीच्या (शिंदे-राष्ट्रवादी)दोन सदस्यांना मतदान करू दिले नाही. या साऱ्या प्रकाराने शिवसेना संतप्त झाली आहे.दरम्यान या सगळ्या राड्याचे पडसाद विधान परिषद आणि विधानसभेत उमटले. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महेश शिंदे यांनी याला फ्रस्ट्रेशन म्हटलं आहे. हे सर्व फ्रस्ट्रेशनमुळे घडलं असल्याचं ते म्हणाले.
निवडणूक आधी आमची जी युती आहे कोरगाव मतदारसंघातली ही भाजप बरोबर झाली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी जी बैठक बोलवली होती.त्या बैठकीमध्ये सर्व महायुतीचे नेते हजर होते. त्या नेत्यांनी असं ठरवलं, प्रत्येक महायुतीचा आमदार स्वतःच्या मतदारसंघात कुणाबरोबर युती करणार हा त्याचा त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या पद्धतीने आम्ही पुढील निर्णय घेतला.
पण नंतर आमच्या आमचे नेतेही शिवसेनेच्या कॅम्पमध्ये गेले होते, पण नंतर जसं सगळ्यांच्या लक्षात आलं की, काही लोकांनी या ठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षातल्या लोकांसोबत युती केलेली आहे. ते आमच्या मतदारसंघात मान्य नव्हतं, त्यामुळे आमच्या दोन्ही सदस्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की कसल्याही परिस्थितीत निवडणूक पूर्ण पूर्व जी युती भाजपबरोबर झाली आहे त्यांच्या बरोबरच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. पण यात काही अजित पवार गटातील काही ५ नेते होते, त्यांना काँग्रेस किंवा शरद पवार गटासोबत जाण्याची इच्छा नव्हती.
पोलिसांसोबत झालेल्या राड्यावरून मंत्री महेश शिंदे म्हणाले, पोलीस यंत्रणा ही त्यांची काम करत असते.आपण सत्तेत असलो तरी पोलिसांच्या यंत्रणेपुढे जाता येत नाही. पोलिसांच्या विरुद्ध जास्त गेलं नाही पाहिजे पोलीस त्यांची कायदेशीर कारवाई करत असतात. आपण पोलिसांच्या अंगावरती गेल्यानंतर त्यांना काही अॅक्शन घेणं गरजेचं असतं आपणही काही मर्यादित स्वरूपात पुढे गेलं पाहिजे. पोलीस यंत्रणेने कुठला बळाचा वापर केला काही केलेलं नाहीये हे आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशन मधून झालंय सदस्यांनी ऐकलं नाही त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी यंत्रणेवरती काढलं, असं महेश शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.