Satara Doctor Case update Saam tv
महाराष्ट्र

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

Satara Doctor Case update : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे...कारण महिला डॉक्टरच्या बहिणीने आता नवा आरोप केलाय.. मात्र हा आरोप काय आहे आणि या मुर्दाड व्यवस्थेनं महिला डॉक्टरचा कसा बळी घेतलाय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचं गुढ आता आणखीच वाढलंय. कारण राजकीय आणि प्रशासकीय बड्या धेंडांना वाचवण्यासाठी खरी सुसाईड नोट आणि संबंधित पुरावेही गायब केल्याचा संशयच महिला डॉक्टरच्या बहिणीने व्यक्त केलाय.

खरंतर 23 ऑक्टोबरला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.. मात्र या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालक प्रशांत बनकरच्या अत्याचाराचा पाढा वाचलाय...मात्र गेल्या 5 महिन्यांपासून पोलीस आणि राजकारण्याच्या दबावाची तक्रार करणारं आणि खुलाशाचं 4 पानी पत्रंच समोर आलंय...

19 जून 2025

पीआय महाडिकांकडून फिटनेस सर्टिफिकेटसाठी दबाव टाकून छळ केल्याचा आरोप

DYSP कडून छळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई ऐवजी डॉक्टरवरच ठपका

जुलै 2025

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या चौकशी समितीसमोर खुलासा पत्र

डॉ. धुमाळ यांच्याकडे तक्रार केल्याचाही पत्रात उल्लेख

खुलासा पत्रात खासदार आणि त्याच्या 2 पीएने दबाव टाकल्याचा उल्लेख

13 ऑगस्ट 2025

तक्रार अर्जावर काय कारवाई झाली? यासंदर्भात डॉक्टरचा RTI

महिला डॉक्टर तब्बल 5 महिने न्यायासाठी व्यवस्थेचं दार ठोठावत होती... 2 वेळा डीवायएसपीकडे तक्रार, 21 वेळा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे तक्रार....मात्र एवढं करुनही मुर्दाड व्यवस्थेनं तिची दखल घेतली नाही...याच राजकीय आणि प्रशासनाच्या अभद्र युतीने महिला डॉक्टरचा बळी घेतलाय.. त्यामुळेच सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी डॉक्टरच्या नातेवाईकांनी केलीय.

आता प्रश्न पडतो तो म्हणजे डीवायएसपींकडे तक्रार करुन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही पोलिसांवर कारवाई का करण्यात आली नाही? पोलीस अधिकाऱ्यांवर नेमका कोणत्या खासदाराचा दबाव होता? उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही महिला डॉक्टरच्या तक्रारीकडे दुर्लक्ष का केलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सखोल चौकशी करणं गरजेचं आहेच.... मात्र त्यासोबतच महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी मोकळीक देणाऱ्या यंत्रणेलाही जबाबदार धरायला हवं...अन्यथा ही एक डॉक्टर नाही तर ही मुर्दाड व्यवस्था कित्येक होतकरु अधिकाऱ्यांचे खून करत राहील आणि यातून शेवटी फक्त आकडेच शिल्लक राहतील..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

Cyclone Alert : भयंकर चक्रीवादळाचं सावट! 110 किमी वेगात हवा तांडव घालणार, IMD चा गंभीर इशारा, भारतावरही संकट?

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

SCROLL FOR NEXT