Satara Women Doctor Death Case Saam Tv
महाराष्ट्र

Doctor Death Case : दुर्योधन-दुशासन भेटले, मुलीच्या मदतीला एकही कृष्ण आला नाही, वडिलांचा भावनिक आक्रोश

Phaltan Doctor Death Case : फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या बीडमधील डॉक्टर मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे आरोपींना फाशीची मागणी केली आहे. “माझ्या मुलीला कृष्ण भेटला नाही” म्हणत भावनिक आवाहन केलं.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Phaltan Doctor Death Case : माझ्या मुलीवर अन्याय, अत्याचार होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. तिली दुर्योधन,दुशासन भेटले. तिला एकही कृष्ण होऊन पावला नाही. इथून पुढे दुसऱ्या मुलीवर असा अत्याचार व्हायला नको, त्यासाठी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असे पीडितेच्या वडिलांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या बीडमधील डॉक्टर मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केलाय.

माझ्या मुलीबरोबर जे झाले.. आता कुठल्याही मुलीवर बलात्कार होऊ नये, आरोपीला मृत्युदंड व्हावा. यासारखे गुन्हे करणार्‍यांमध्ये भीती निर्माण व्हायला हवी, त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा, हा मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.कृष्ण बनून अत्याचार थांबवावा, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, फलटणमधील डॉक्टर आत्महत्या अन् बलात्कार प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी कऱण्यात येत आहे.

फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर मुलीचे वडील काय म्हणाले ?

आम्ही हे सर्व घडण्याच्या आधी मुलीला भेटायला फलटणमध्ये गेलो होतो. आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो होते. तिथे गेल्यानंतर विनाओळखीचा धष्टपुष्ट माणूस होता. कोण होता माहिती नाही. सर तुम्ही मॅडेमचे वडील का? काही लागले तर सांगा असे तो म्हणाला. तेवढ्यात मुलीने माझा हाताला धरला बाजूला नेलं अन् आपल्याला यांची काय गरज असे म्हणाली. तो गेल्यानंतर कुणालाही बोलू नका. हे लोक माझ्यावर दबाव आणायला बघतात, असे मुलगी म्हणाली होती.

माझ्या मुलीसोबत जे घडलं, ते इतर कोणत्याही मुलीवर अत्याचार होता कामा नये. त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. ही माझी मुख्यमंत्र्‍यांकडे मागणी आहे. माझ्या मुलीवर अन्याय होतोय, ते सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. तिथे दुर्योधन, दुशासन झाले.. माझ्या मुलीला एकही कृष्ण होऊन पावला नाही. इथून पुढे मुलीला एकतरी कृष्ण पावायला हवा. तिच्यावर अन्याय होऊ नये, ही मुख्यमंत्र्‍यांकडे कळकळीची विनंती आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ‘त्या’ व्यक्तीपासून दूर राहा नाही तर वैवाहिक जीवनात… कुणाच्या राशीत आज काय? वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसलं; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपला इशारा, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: पुढील ३ तासात जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस

'लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज...' मुख्यमंत्री फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाले?

SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT