350-YEAR-OLD STANDING FAST TRADITION IN PANDEY VILLAGE saam tv
महाराष्ट्र

9 दिवस ९ रात्र उभ्यानं उपवास, ना बसणे ना झोपणे, केवळ काठीचा आधार, साताऱ्यातील पांडे गावाची 350 वर्षांची अनोखी परंपरा

350-Year-Old Tradition in Pandey Village: नवरात्रोत्सवात देवीचा जागर सुरु असतो. अनेकजण कडक उपवास करतात. काही भाविक साधनेत मग्न असतात. मात्र राज्यात एक असं गाव आहे जिथे लोक नऊ दिवस बिछान्यावर झोपत नाहीत. शेकडो वर्षांची ही परंपरा श्रद्धापूर्वक कुठे जपली जाते? पाहूया एक खास रिपोर्ट....

Girish Nikam

ही दृश्यं पाहा....मंदिरातील हे पुरुष आणि त्यांनी घेतलेला झोपाळ्याचा आधार पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल....एका पायावर ही कुठली साधना सुरु आहे ? हा काय प्रकार आहे ? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

पण ही आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पांडे गावची ३५० वर्षे जुनी अनोखी प्रथा.. गावातल्या घरातील एक तरी व्यक्ती ९ दिवस उभे राहून उपवास करते. गावातील काळ भैरवनाथाच्या मंदिरात नवस बोलून अशा प्रकारे उभे राहून ९ दिवस उपवास केला जातो.

उपवास करणारे जमिनीवर बसत नाहीत आणि झोपतही नाहीत. फक्त काठीचा आधार घेऊन चालायचं. आराम करायचा झालाच तर मंदीरात तयार केलेल्या झोपाळ्यावर एक पाय खाली ठेउन पडून रहायचं.

विशेष म्हणजे उपवास कर्त्याला पांढरा पोशाख परिधान करून रोज अनवाणी सकाळ, संध्याकाळ गावाला ९ दिवस प्रदक्षिणा घालाव्या लागतात. श्रद्धा आणि संयमात मोठी शक्ती असते. पांडे गावाने आपली परंपरा अगदी श्रद्धापूर्वक जपली आहे. आदीमायेचा हा जागर अनेकांना आनंद आणि शक्ती देऊन जातो. एव्हढं निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नर्सरी ते इयत्ता पहिली अॅडमिशन घेताना बालकाचं वय किती असावं, सरकारनं जारी केले नवे निकष, कधीपासून होणार लागू

तुळजाभवानी मंदिरात मटका किंगला VIP ट्रीटमेंट, प्रवेश बंदीनंतरही मटका किंग गाभाऱ्यात, भाविक ताटकळत, मटका किंगसाठी पायघड्या

कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचे वडील शिंदेसेनेत; राजकारण ढवळून निघालं

Maharashtra News Live Update: ठाण्यात पाण्याची नासाडी! नितीन कंपनी परिसरात पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT