Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara : उड्डाण पुलावर रिल्स काढणे पडले महागात; नव्या गाडीसोबत रिल्ससाठी वाहतूक रोखली, पोलिसात गुन्हा दाखल

Satara News : रस्त्यात गाड्या उभ्या करून हायवेवरील वाहतुकीला अडथळा होईल; अशा प्रकारे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून शूटिंग केले. हे शूटिंग करताना हायवेवरील कोल्हापूर ते पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ट्रॅफिक जाम

ओंकार कदम

सातारा : सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी वेगवेगळ्या रिल्स करून टाकल्या जातात. हे रिल्स तयार करण्याच्या नादात कोण काय करेल याचे भान नसते. अशात नवीन चारचाकी गाडी घेतल्याने आनंदाच्या भरात महामार्गावरील उड्डाणपुलावर मधोमध गाडी थांबवून रिल्स काढण्यास सुरवात केली. मात्र हा रिल्स करणे तरुणाच्या अंगाशी आले असून त्याच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर फेमस होण्याचे फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने तरुण वर्गात हे प्रमाण अधिक वाढले असून यासाठी वेगवेगळ्या रिल्स तयार केल्या जात असतात. परंतु अनेकदा रिल्स केल्यानंतर त्या सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्याचे परिणाम देखील भोगावे लागत असतात. असाच प्रकार सातारा शहरात समोर आला आहे. 

वाहतूक रोखून केली रिल्स 

सातारा शहरालगत असणाऱ्या उड्डाण पुलावर एका तरुणाने नवीन वाहन खरेदी केल्याच्या आनंदात रिल्स तयार करण्याच्या हेतूने उड्डाणपुलावर गाडी उभी केली. रस्त्यात गाड्या उभ्या करून हायवेवरील वाहतुकीला अडथळा होईल; अशा प्रकारे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून शूटिंग केले. हे शूटिंग करत असताना सातारा- बेंगलोर हायवे वरील कोल्हापूर ते पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ट्रॅफिक जाम झाली होती. 

पोलिसांकडून कारवाई 

नवीन गाडी घेऊन मागे इतर गाड्यांचा ताफा उभा करून हे शूटिंग करण्यात आले. यावेळी ड्रोनचा वापर देखील करण्यात आला. त्यानंतर इंस्टाग्रामवर याची रिल्स तयार करून पाठवण्यात आली. या प्रकारानंतर मात्र सातारा येथील पोलिसांनी वाहनाचा मालक आणि ड्रोन वापरणारे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच पद्धतीने त्यांच्यावर आता कारवाई देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT