Amravati : पावसाअभावी पिकांना धोका; अमरावती जिल्ह्याच्या काही भागातील चित्र, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

Amravati News : नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पिकांना पाहिजे, त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पावसाअभावी धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा असून आकाशाकडे नजरा लागल्या
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे शेतीची कामे देखील रखडलेली आहेत. दरम्यान अमरावती जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही गावांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. कारण पाऊस नसल्याने जमिनीतून निघालेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

अमरावती जिल्ह्यात सहा लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. याची टक्केवारी ९५ टक्के असून केवळ पाचच टक्के पेरण्या अमरावतीत करणे बाकी आहे. मात्र अमरावतीच्या काही भागात नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पिकांना पाहिजे, त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पावसाअभावी धोका सुद्धा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा असून आकाशाकडे नजरा लागल्या आहेत. 

Amravati News
Accident News : मामाचा अंत्यसंस्कार आटोपून परतताना काळाचा घाला; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक

सोयाबीनची सर्वाधिक लागवड 

यावर्षी सर्वाधिक सोयाबीन पिकाची लागवड केलेली दिसून येत आहे. यात कापसाची दोन लाख २९ हजार हेक्टर मध्ये लागवड करण्यात आली आहे. तसेच सोयाबीनची देखील दोन लाख २९ हजार हेक्टर वर लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे मेळघाटातील धारणी तालुक्यात २८० हेक्टरवर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्वरित पाच टक्के पेरण्या मंगळवारपर्यंत पूर्ण होईल; अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे, आता पेरण्या पूर्ण झाल्याने दमदार असा पाऊस पडावा अशी अपेक्षा लागून राहिली आहे.

Amravati News
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील आठ कमकुवत पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; गुजरातच्या पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

धाराशिवमध्ये महिनाभरापासुन पावसाची दडी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात जवळपास महिनाभरापासुन पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार देखील थांबल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पशुपालकावरील आर्थिक अडचणीचे सावट अधिक गडद झाल आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे आर्थिक व्यवहार, देवाण- घेवाण ठप्प झाल्याने पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. तर खरिपाची पेरणी केली; मात्र शेतीमधील मशागतीच्या कामाला पैशाची गरज लागत असताना पावसाच्या गैरहजरीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अनेकजण आपल्या दारातील जनावरे बाजारात विकताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com