महाराष्ट्र

Tejas Mankar Martyr : गोळीबारात २२ वर्षीय तरुण जवान शहीद; निरोप देताना हजारोंची गर्दी, साऱ्यांचा कंठ दाटला

ओंकार कदम

Satara News : पंजाबच्या बठिंडामध्ये सैन्य तळावर 12 एप्रिलला झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील करंदोशी गावातील तेजस मानकर या २२ वर्षीय जवानाच्या डोक्यात गोळी लागली होती. या दुर्घटनेनंतर त्यांना मिलिट्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेजस यांना वाचवण्यासाठी डॉक्टकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र डॉक्टरांना यात अपयश आले. आज तेजस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. (Marathi News)

अवघ्या 22 वर्षांचा जवानाला वीरमरण आले आहे. आज हजारो लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात तेजस यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तेजस यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या गावी आणण्यात आले. यावेळी लोकांनी ठिकठिकाणी तेजस मानकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

ठिकठिकाणी शहीद जवान तेजस मानकर अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. पार्थिव घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर पोलिस विभागाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून जवान तेजस मानकर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांचा मोठा भाऊ मेजर ओंकार मानकर याने तेजस यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदाय आणि नेते मंडळी उपस्थितीत होते. वीरमरण आलेल्या तेजस मानकर यांच्या वडिलांनी बठिंडा येथे झालेल्या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.

तेजस यांचे प्राथमिक शिक्षण (Education) गावी झाले होते. अत्यंत हुशार, हजरजबाबी व मनमिळाउ स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे. वडिल सेवेवर रुजू असताना त्यांनी विविध ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केले. वडील व भावाप्रमाणे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, तसेच देशसेवेसाठी तेजस गेल्या दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT