Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara : फॉलोवर्स वाढविण्यासाठी सोशल मीडियावर अनोखी जाहिरात; महिलांची दुकानात गर्दी, दुकान मालकावर गुन्हा दाखल

Satara News : फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे. सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली

ओंकार कदम

सातारा : आपल्या दुकानाची किंवा प्रॉडक्टची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती केल्या जात असतात. मात्र सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी सोन्याच्या दुकानाची केलेली अनोखी जाहिरात दुकानदाराच्या अंगलट आली आहे. कारण या जाहिरातीमुळे दुकानात गर्दी झाली आणि नागरिकांसाठी समस्या बनली. या कारणावरून दुकान मालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरी दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची जाहिरात करण्यास सुरवात केली होती. मात्र सोशल मीडियावर केलेली हि अनोखी जाहिरात त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. कारण हि जाहिरात पाहून अनेकांनी दुकानात गर्दी केली. या गर्दीमुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे ट्राफिक जामचा सामना करावा लागत होता. 

सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातीमध्ये दुकानाचा इन्स्टाग्राम पेज फॉलो करा आणि दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे ५० व्ह्यू मिळाले की त्या महिलेला एक ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मोफत देण्याची ही जाहिरात होती. सदरची जाहिरात सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची झुंबड उडाली. या जाहिरातीमध्ये पहिल्या १००० येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं होतं.  

दुकान मालकावर गुन्हा दाखल 

मात्र ऐनवेळी परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली. परिणामी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आले अन् त्यांनाच विसरले? – सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांचा घणाघात!

Maharashtra News Live Update: पुण्यातील वाहतूक कोंडी, हॉकर्स आणि वाढत्या अपघातांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक

Kidney Health: किडनीच्या समस्यांनी त्रस्त आहात? सकाळी 'या' हिरव्या पानांचं पाणी प्या, लगेच मिळेल आराम

Nagpur : शाळा, जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी; नागपुरात खळबळ

Kalyan Crime: भावाचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; चार ते पाच जणांकडून धारदार शस्त्राने वार

SCROLL FOR NEXT