Pimpri Chinchwad : सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न; रावण टोळीतील आणखी तिघे ताब्यात

Pimpri Chinchwad News : कारमधून दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या तिघांना यापूर्वी ताब्यात घेतले होते, तर फरार असलेल्या रावण टोळीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadPimpri Chinchwad
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर परिसरात सराफा दुकानात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील काही जणांना पोलिसांनी त ताब्यात घेतले होते. मात्र या टोळीतील काही सदस्य फरार झाल्याची घटना घडली होती. या कुख्यात रावण टोळीतील आणखी तीन सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार पिस्टल, तीन जिवंत काडतुसे असे पोलिसांनी जप्त केले आहेत. 

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी आपल्या इतर काही सहकार्यांसोबत चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील नगर येथील एका सराफा व्यापाराच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी जाणार होते; असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र दरोडा टाकण्याच्या आधीच या टोळीतील काहीजण पोलिसांच्या ताब्यात सापडले होते. मात्र काहीजण फरार झाले होते. त्यांचा तपास पोलिसांकडून सुरु होता. 

Pimpri Chinchwad
Crime News : लिफ्ट देत चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने लुटले; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीतील आणखी तीन सदस्यांना गुंडांविरोधी पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच रावण टोळीतील दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार पिस्टल, तीन जिवंत काडतुसे असा जवळपास आठ लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अनिकेत अशोक बाराथे (वय २७), अश्विन सुधीर गायकवाड (वय २१) आणि यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा (वय १९) असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या रावण टोळीतील सदस्यांची नाव आहेत. 

Pimpri Chinchwad
Heavy Rain : भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात मुसळधार; घरांसह दुकाने, गुदामात शिरले पाणी

चोरी करणाऱ्या सर्राइत टोळी ताब्यात 
टोळीतील सदस्यांनी महाळुंगे एमआयडीसी परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरी केलं. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांच्या घरात बळजबरीने घुसून तसेच त्यांचे हात पाय आणि तोंड बांधून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटला असल्यास पोलीस तपासात उघडकीस झाल आहे. या टोळीतील प्रसाद भागवत पांडव (वय २५), आशिष राजाराम भोसले (वय १९), ऋषिकेश नवनाथ धाकतोंडे (वय २९) आणि शिवम उर्फ पवन रमेश भालेराव (वय २१) या चार आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात बेड्या ठोकल्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com