Shekhar Gore Saam tv
महाराष्ट्र

Shekhar Gore : साताऱ्याला मिळणार आणखी एक आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निवड शक्य

Satara News : माण विधानसभा मतदार संघातून भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयात मोठा वाटा त्यांचे बंधू सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता.

ओंकार कदम

सातारा : विधानसभा निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांना निवडून देण्यात त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा मोठा वाटा राहिला आहे. दरम्यान सुरुवातीला दोन्ही भावांमध्ये असलेले मतभेत मिटवून शेखर गोरे यांना देखील आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शेखर गोरे यांच्या रूपाने नवीन आमदार मिळणार आहे. स्वतः गोरे यांनी तसे एका कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदार संघातून भाजपचे सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयात मोठा वाटा हा त्यांचे बंधू भाजपचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता. या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवून दोन्ही भावांना एकत्र आणले. 

शेखर गोरे यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता 

वाद मिटविल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मदत झाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. त्या दरम्यान शेखर गोरे यांना आमदार करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर शेखर गोरे यांना ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. 

शेखर गोरे यांचे कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिले आश्वासन

याबाबत स्वतः शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार हे मी जबाबदारीने सांगतो. माझा कार्यकर्त्यांनी या मतदार संघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवसाचे रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळेच जानेवारी-  फेब्रुवारीच्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडको विभागाचा भोंगळ कारभार उघड

History Of Hello: फोनवर 'हॅलो' आपण का बोलतो? इतिहास ऐकून थक्क व्हाल

Nanded : स्मशानभूमीच्या जागेवरून गावकरी आपापसात भिडले; गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास विरोध

Dugarwadi Waterfall: एका दिवसात धबधब्यावर जाऊन भिजायचंय? मग नाशिकजवळचा 'हा' धबधबा ठरेल परफेक्ट

जनसुरक्षा विधेयकावरून वातावरण तापलं; संभाजी ब्रिगेडचं मंत्रालयात घुसून आंदोलन|VIDEO

SCROLL FOR NEXT