Shambhuraj Desai Saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : खोटे मतदार आहेत तर पुरावे द्या, निवडणूक आयोग कारवाई करेल; शंभूराज देसाई यांचे राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

Satara News : संजय राऊत काय आहेत हे ठाणेकरांना चांगलेच माहित आहे. आता जे बहुमत आहे, त्यापेक्षा जादा बहुमत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल असे सडेतोड प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली

ओंकार कदम

सातारा : राज ठाकरे यांनी जर ९६ लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे. अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल; असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. 

राज ठाकरे यांनी ९६ लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिल आहे. मंत्री देसाई म्हणाले, कि निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्यानंतर निवडणूक आयोग प्रत्येकावर बोलू शकत नाही. सत्ताधारी हे वस्तुस्थिती मांडत आहेत. आम्ही याचे राजकीय भांडवल करत नाही.

मागील लोकसभेला आम्हाला जागा कमी मिळाल्या महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. त्यावेळी आम्ही हरकती घेतल्या नव्हत्या. त्यामुळे वस्तुस्थिती स्वीकारले पाहिजे. तुमच्या जागा निवडून आल्या की मतदार यादी योग्य आणि आम्ही जिंकलो की मतदार यादीत घोळ; याचा अर्थ भविष्यात त्यांना पराभव दिसू लागला आहे.

राऊतांनी भांडुपची निवडणूक लढवून दाखवावी 
ठाणे- मुंबई या ठिकाणी गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार या संजय राऊतांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्ही लोकांतून निवडून आलो आहोत. संजय राऊत यांच्यासारखी राज्यसभेवर बॅकडोर एन्ट्री केली नाही. संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या महानगरपालिकेच्या वार्डातून निवडून येऊन दाखवावी. मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार करावा. ठिकऱ्या कोणाच्या होणार याबाबत ठाणेकर जनता दाखवून देईल.

तर आम्ही म्हणाल ते ऐकू 

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली होती. त्यावेळेस देखील संजय राऊत यांनी मुंबईत येऊन दाखवा; असे विधान केलं होतं. आम्ही खुलेआम त्यावेळी वरळीतून वाजत गाजत गेलो. त्यावेळी काय झालं. संजय राऊत जे बोलतात त्याचं अर्ध वाक्य जरी खरं ठरलं तरी आम्ही म्हणल ते ऐकू; अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT