Shambhuraj Desai Saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक; शंभूराज देसाई यांची आंदोलन स्थगित करण्याची जरांगे पाटलांकडे विनंती

Satara News : कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचा दिशेने येणारे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

ओंकार कदम

सतारा : मराठा आरक्षण विषयात सगेसोयरे बाबतीत जी व्याख्या केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढावा लागला, (Satara) तरी सरकार सकारात्मक असल्याचे आणि सरकार मराठा समाजाचा विरोधात नाही; असे मत मांडत स्थगित करण्याची विनंती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. (Live Marathi News)

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळणार असल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईचा दिशेने येणारे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. त्याचबरोबर मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान जर अनवधानाने चार दोन माणसांमुळे परस्थिती हाताबाहेर जावू शकते. (Maratha Aarkshan) जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्याचे आंदोलन स्थगित करावे असं देखील देसाई म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारकडून कोणताही ट्रॅप नाही 

मराठा आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन होत असल्याने मनोज जरंगे पाटील यांनी त्यांच्यावर ट्रॅप लावला जात असल्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र असा कोणताही ट्रॅप राज्य सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने लावला नसल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT