Vasai Virar Corporation : मालमत्तेला सील ठोकून करणार लिलाव; कर वसुलीसाठी पालिका अँक्शन मोडवर

Vasai Virar : आर्थिक वर्ष अर्थात मार्च महिना संपायला केवळ अडीच महिने राहिले आहेत. त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने महसूल उत्त्पनावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली
Vasai Virar Corporation
Vasai Virar CorporationSaam tv

महेंद्र वानखेडे

विरार : वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता आणि पाणीपट्टी कर न भरणाऱ्या करदात्यांसाठी आता धोक्याची घंटा सुरु झाली आहे. (Vasai Virar News) महापालिका आता अँक्शन मोडवर आली असून, कर भरणा करण्याबाबत नोटीस देऊनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या करधारकांच्या मालमत्तेला सील ठोकून लिलावात काढणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत अभय योजना सुरु असून, त्याद्वारे सवलतीचा लाभ घेवून, (Tax) कर भरणा करण्याचं आवहान पालिकेच्या आयुक्तांनी केलं आहे. (Breaking Marathi News)

Vasai Virar Corporation
Cold Wave : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट; तापमान ८ अंश सेल्सिअसवर

आर्थिक वर्ष अर्थात मार्च महिना संपायला केवळ अडीच महिने राहिले आहेत. त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने महसूल उत्त्पनावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकासाठी १ जानेवारीपासून महापालिकेने कडक धोरण राबवण्याच स्पष्ट केलं आहे. त्यातच सध्या महापालिकेने (Vasai Virar Municipal Corporation) जास्त कर असणाऱ्यासाठी अभय योजना ही सुरु केली आहे. त्याची २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, कर भरणाऱ्या करदात्यांना वेगवेगळ्या पध्दतीने सूट ही देण्यात आल्या आहेत. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasai Virar Corporation
Jalgaon Accident : पुलाचा कठडा तुटून विटांचा ट्रक पलटी; एका मजुराचा मृत्यू, तीन मजुर गंभीर जखमी

५०० कुलूप खरेदी 

पाणीपट्टी आणि मालमत्तेचा कर न भरणाऱ्या करदात्यांवर कारवाईचा बडगा आता पालिका उचलणार आहे. त्यामुळेच पालिकेने मालमत्ता सील करण्यासाठी ५०० च्यावर कुलुपांची खरेदी केली आहे. त्यामुळे आपली मालमत्ता वाचविण्यासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरून सहकार्य करावे असे अहवानह पालिका आयुक्तांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com