मुंबई : सातारा जिल्ह्यात एक तरूणी २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीय. ती सेल्फी काढत असताना तोल जावून दरीत पडल्याचं समोर आलंय. या घटनेच तरूणीचा जीव वाचला आहे, परंतु तिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिन अतिशय निसरडी झाली आहे. त्यामुळे फिरण्यासाठी टेकडीवर गेलेली ही तरूणी सेल्फी घेण्याच्या नादात दरीत पडली.
‘सेल्फी’ काढायला गेली अन्...
ही घटना साताऱ्यातल्या ठोसेघर सज्जनगड परिसरात घडली आहे. डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल गेला आणि तरूणी थेट दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटावरच एका झाडात अडकली आणि तिचा जीव (Satara News) वाचला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवेंद्रराजे ट्रेकर्स टीमने या तरूणीला बाहेर काढलं आहे, तर दरीत कोसळल्यामुळे तरूणीला दुखापत देखील झालेली आहे.
२५० फूट दरीत कोसळली
उंचावरून कोसळल्यामुळे तरूणी गंभीर जखमी झालीय. ही घटना साताऱ्यातील सज्जनगड (Sajjangad Fort) परिसरातील आहे. सेल्फीचा मोह जीवावर बेतल्याचं दिसत आहे. दैव बलवत्तर म्हणून या तरूणीचे प्राण वाचले आहे. या तरूणीला शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या रेस्क्यू टीमने सहीसलामत बाहेर काढलं. दुखापत झालेली असल्यामुळे तिला साताऱ्यातील खासगी रूग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं (Girl Fell 250 Feet In Valley) आहे.
सेल्फीचा नाद नडला
साताऱ्यातील ठोसेघर सज्जनगड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सध्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने तेथील पर्यटन आणखी खुललं आहे. अनेक तरूण-तरूणी फिरण्यासाठी डोंगर-दऱ्यांमध्ये जात असतात. परंतु, अशा वेळी काळजी घेणं, सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. पावसामुळे जमिन निसरडी झालेली आहे. अशातच तरूणी टेकडीच्या कडेवर उभी राहून सेल्फी (Selfie) घेत होती, परंतु तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.