Indian Railway
Indian RailwaySaam Tv

Selfie On Railway Track: सावधान ! रेल्वे ट्रॅकवर सेल्फी किंवा व्हिडिओ काढताय? तर भरावा लागेल लाखों रुपये, काय सांगतो कायदा

Don't Take Selfie On Railway Track : रेल्वे ट्रॅकवर उभे राहून तुम्ही देखील सेल्फी काढत असाल तर ही बातमी नीट वाचा.
Published on

Indian Railway Rule : बदलत्या जगात सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही काळाची गरज बनत चालली आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. मग ते प्रत्येक क्षणाचे फोटोज सोशल मीडियावर टाकणे असो किंवा वारंवार सेल्फी काढणे असो.

कधी कधी आपण लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात अशा काही करामती करतो. ज्यामुळे आपल्या इतर अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागते. ज्यामुळे आपला जीव ही जाऊ शकतो. रेल्वे (Railway) ट्रॅकवर उभे राहून तुम्ही देखील सेल्फी काढत असाल तर ही बातमी नीट वाचा. जर तुम्ही रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर ट्रेनच्या जवळ सेल्फी घेत असाल तर सावध राहा कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला लाखोंचा दंड (Pay) भरावा लागू शकतो.

Indian Railway
Indian Railway New Service : रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होणार ! पैसे न देता बुक करा तिकीट, कसे ते जाणून घ्या

1. सेल्फीच्या नादात जेलही होऊ शकते.

जर तुम्ही रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या जवळ सेल्फी काढताय तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागू शकते. रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढताना आपण आपल्या जीवाची बाजी लावत असतो त्यामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो याचीच खबरदारी म्हणून कोणी रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढत असेल तर त्याला १००० रुपयाचा दंड आणि ६ महिन्यांचा तुरूंगवास होऊ शकते.

2. रेल्वे अधिनियम १९८९

रेल्वे अधिनियम १९८९ द्वारा कलम १४५ व १४७ च्या अंतर्गत रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे कायद्याने गुन्हा आहे. या नियमानुसार (Rule) तुम्हाला शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेताना जीवही जाऊ शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी १००० रुपये दंड आणि ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागेल.

Indian Railway
Indian Railway Rule : रेल्वेच्या मिडल बर्थ सिटबद्दल माहीत आहे का ? काय सांगतो रेल्वेचा नियम, प्रवाशांनी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

3. आवाहन

रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वे प्रवाशांना रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी न घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठी नियमित जाहिरातीही दिल्या जातात. सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना असे न करण्याचा सल्लाही दिला जातो. असे सेल्फी घेतल्याने जीव धोक्यात येतो, असे भारतीय रेल्वे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. म्हणूनच जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com