Koyna river Karad mass bird death forest department probe SAAM TV
महाराष्ट्र

कराडमधील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू, वनविभागातर्फे तपास सुरू

Suspicious death of over 35 birds in koyna river : कराड येथील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक 'पिवळा धोबी' प्रजातीच्या पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, मृत कासवाच्या संपर्कात आल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Saam Tv

ओंकार कदम कराड,सातारा

कराड येथील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, वन्यजीवप्रेमींसह नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीकाठच्या परिसरात ‘पिवळा धोबी’या प्रजातीचे पक्षी मोठ्या प्रमाणावर वावरत होते. याच परिसरात एक कासव मृत अवस्थेत पडून होते, ज्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्या होत्या.

हे मृत कासव खाण्यासाठी किंवा त्याच्या आसपास अनेक पक्ष्यांचा थवा जमला होता. मात्र, अत्यंत अचंबित करणारी बाब म्हणजे, या मृत कासवाजवळ जमलेले पक्षी अवघ्या काही मिनिटांतच एकापाठोपाठ एक जमिनीवर कोसळले. कोणतीही पूर्वलक्षणे किंवा आजाराची चिन्हे नसताना अचानक ३५ हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत वनविभाग तातडीने सतर्क झाला असून घटनास्थळी धाव घेतली आहे. BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.हा मृत्यू दूषित पाणी, विषबाधेमुळे वातावरणातील बदलांमुळे की अन्य कोणत्या कारणांमुळे झाला, हे शोधण्याचे मोठे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे.

नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबई आणि भोपाळ येथील उच्चस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अहवाल आल्यानंतरच या सामूहिक मृत्यूमागचा नेमका उलगडा होईल,अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : काही केल्या झोपच लागत नाही? या ७ गोष्टी करा, मनातलं तुफान शांत होईल

Diwali Utne : अभ्यंगस्नान करताना उटणे तेलातून लावावे की दुधातून, काय आहे फायदेशीर

गुड न्यूज! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह महिला पोलिसाचं तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ; कारणेही तितकीच धक्कादायक

Mobile Charging Safety Tips: मोबाईल चार्जिंग करताना ७ चुका कोणीही करू नका, होऊ शकतो मोठा स्फोट!

SCROLL FOR NEXT