सातारा : गुटखा व्यावसायिकाकडून खंडणी मागितली जाते. मात्र खंडणी मागणाऱ्यावर कारवाई होत नसल्याच्या कारणावरून हॉकर्स व्यवसायिकाने (Satara) पत्नीसह पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच अडविल्याने पुढचा अनर्थ टाळला आहे. (Tajya Batmya)
सातारा शहरातील प्रकाश डागा या हॉकर्स दाम्पत्याला साहिल नावाच्या गुटखा व्यावसायिकाने दोन लाखाची खंडणी मागितली असल्याचा आरोप होत आहे. पोलीस गुटखा व्यवसायिकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप डागा यांनी केला असून गुटखा व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते पोलिसांना करत होते मात्र पोलिसांनी टाळाटाळ केली जात होती.
पोलिसांची सतर्कता
पोलिसांकडून टाळाटाळ केल्यामुळे आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थाना समोर प्रकाश डागा या हॉकर्स व्यावसायिकाने पत्नी समवेत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.