Satara News Saam Tv
महाराष्ट्र

Satara News: प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांवर होणार कारवाई, भरावा लागले इतका दंड

Shambhuraj Desai News: महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे.

Satish Kengar

Satara News:

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.

महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वच्छता विभागाची बैठक 4 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती या अनुषंगाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गाव स्तरावर 1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून 468 प्लास्टिक विक्रेते दुकानदार व उघडा वरती कचरा फेकणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई करून 62,502 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत 1332 गावांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायत यांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करणे यावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी, अशा सूचना शंभूराजे देसाई यांनी दिल्या आहेत.

तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन जिल्ह्यातील मोठ्या पंचायती, बाजाराची गावे,पर्यटन स्थळे यामध्ये कडक कारवाई कराव्यात प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात यावा. या कामासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य करावे, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

SCROLL FOR NEXT