Satara khatav Taluka News
Satara khatav Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Satara News : झोका खेळताना ९ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; साताऱ्यातील दुर्देवी घटना

ओंकार कदम

Satara Crime News : पालकांनो आपल्या लहान मुलाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, जराही दुर्लक्ष झालं तर ते महागात पडू शकतं. कारण, साताऱ्यात एक अशी घटना घडली, जी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. लोखंडी पाईपला साडी बांधून एक चिमुकली झोका खेळत होती. अचानक तिची त्यात मान अडकली आणि फास लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला.  (Maharashtra Breaking News)

सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या तडवलळे येथे सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पौर्णिमा शंकर फाळके (वय ९ वर्ष) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पौर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती.

तिने घरातील लोखंडी पाईपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकली. काही कळण्याच्या आतच तिला फास बसला. आरडाओरड केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनात आला.

त्यांनी तातडीने पौर्णिमाकडे धाव घेतली. कुटुंबियांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज (ता. खटाव) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घरात झोका खेळत असताना अचानक चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शंकर पोपट फाळके (वय ४०, रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस हवालदार एस. एल. वाघमारे तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT