Satara : एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून भर दिवसा खून!
Satara : एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून भर दिवसा खून! SaamTvNews
महाराष्ट्र

Satara : एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून भर दिवसा खून!

ओंकार कदम

सातारा : सातारच्या पाटण तालुक्यातील चाफळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चाफळ गावाच्या स्वागत कामानीजवळच, एकतर्फी प्रेमातून १८ वर्षीय युवतीचा भरदिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

अनिकेत मोरे (२२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खूनानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. तसेच त्याने गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली. त्याच्या कडून सदर घटनेची माहिती ऐकताच पोलिसांची एकच धावपळ उडाली.

घटनास्थळी मल्हारपेठ पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. खून झालेली युवती व संशयित आरोपी अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. युवतीचे मूळगाव वाठार किरोली, तर अनिकतचे गाव शिरंबे (ता. कोरोगाव) आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

SCROLL FOR NEXT