Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Atul Bhosale, Devendra Fadnavis,  saam tv
महाराष्ट्र

Satara Lok Sabha Constituency: उदयनराजे आहेतच, तरीही... सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप शाेधताेय उमेदवार?

या बैठकीत फडणवीस हे कमिटीकडून काही महत्वाच्या बाबी समजून घेणार आहेत.

Siddharth Latkar

Devendra Fadnavis In Karad: खासदार उदयनराजे भाेसले (MP Udayanraje Bhosale) यांच्याबराेबरच आणखी एका उमेदवाराचा शाेध भाजपने (BJP) सातारा लाेकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) घेण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये क-हाड दक्षिणचे भाजपचे नेते अतूल भाेसले यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Maharashtra News)

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासमेवत आज (गुरुवार) भाजपची बैठक क-हाड येथे हाेणार आहे. ही बैठक सातारा लोकसभा मतदारसंघातील कोअर कमिटीची आहे. या बैठकीत फडणवीस हे कमिटीकडून काही महत्वाच्या बाबी समजून घेणार आहेत.

खासदार उदयनराजे भाेसले हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. आगामी काळात हाेणा-या लाेकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भाेसले हेच सातारा लाेकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख उमेदवार मानले जात आहेत. दरम्यान या मतदारसंघात आणखी एक भाजपचा पर्यायी उमेदवार असावा यासाठी रणनिती आखण्याचे नियाेजन सुरु आहे.

त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. आत्तापर्यंत तरी भाजपकडून (BJP) त्याबाबत दुजाराे देण्यात आला नसला तरी कराड दक्षिणचे भाजपचे नेते अतूल भाेसले यांच्याकडे त्यादृष्टीने पाहिले जात आहे अशी मात्र चर्चा सुरु आहे .

असे असले तरी सातारा लाेकसभा मतदारसंघाचा विचार केला तर उदयनराजे हे सक्षम उमेदवार असल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp), काॅंग्रेस (congress) यांच्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजप सावध पावलं टाकूनच निर्णय घेईल अशी चिन्ह आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT