Udayanraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची जोरदार फिल्डिंग; "आरंभ है प्रचंड" लिहिलेलं पोस्टर चर्चेत

Udayanraje Bhosale Poster : सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु खासदार उदयनराजे या मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Ruchika Jadhav

ओंकार कदम

Satara Lok Sabha Constituency :

खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वागत सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आरंभ है प्रचंड..., असे वाक्य पोस्टरवर लिहित उदयनराजे यांचे फोटो भाजपच्या चिन्हासहित सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत. या पोस्टरची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु खासदार उदयनराजे या मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. खासदार उदयनराजेंचा महाराष्ट्रात असलेला मोठा फॅन फोलोवर्स सर्वांनाच माहीत आहे.

जरी भाजपने अजूनही उमेदवारी जाहीर केली नसली तरी दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात दिल्ली येथे बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत उदयनराजेंना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.

त्यानंतर उदयनराजे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उदयनराजेंचा भव्य स्वागत सोहळा आयोजित केला आहे. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारी तीन वाजता सातारा जिल्ह्याची बॉर्डर असणाऱ्या नीरा नदी पूल शिरवळ येथून या स्वागत सोहळ्याला सुरुवात होईल.

शिरवळ ते सातारा येथे उदयनराजेंचे निवासस्थान जलमंदिरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भव्य सत्कार आणि स्वागत सोहळा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून माहिती दिली जात आहे. या स्वागत सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT