satara local crime branch & karad police arrested one for beating women 
महाराष्ट्र

Karad: संबंध ठेवले, लग्नही नाही; चिठ्ठीतील मजूकारातून ४ तासांत खूनी सापडला

साम न्यूज नेटवर्क

सातारा : कार्वे (ता. क-हाड) येथे एका महिलेचा साेमवारी खून झाला हाेता. संबंधित महिला काेण हाेती हे त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांना समजू शकले नव्हते. त्यानंतर पाेलिसांनी अवघ्या चार तासात या खूनाचा छडा लावून एकास अटक (arrest) केली आहे. (satara local crime branch and karad police arrested one for beating women)

खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्याच्या आधारे संबंधित महिला (women) ही महिंद (ता. पाटण) येथील असल्याचा उलगडा झाला. याच चिठ्ठीच्या माध्यमातून संशयित आराेपीस पकडण्यात पाेलिसांना यश आले आहे.

सातारा (satara) जिल्ह्यात या खूनामुळे खळबळ उडाली हाेती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या जिल्ह्यात विशेषत: कराड (karad) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले हाेते. पाेलिसांनी शिताफीने संबंधित आराेपीस जेरबंद केल्याने आता पाेलिसांची समाज माध्यमातून काैतुक केले जात आहे.

दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खून झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळूंखे (वय ३० , राहणार महिंद, ता. पाटण) (patan) असे आहे. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत एका व्यक्तीचे नाव आहे. त्याने मला लग्न करताे म्हणून आणले, माझ्याशी संबंध ठेवले. माझ्या बराेबर लग्न करत नसून मला मारहाण करुन माझ्याशी संबंध ठेवले आहेत. मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास ताे जबाबदार आहे असा मजूकर हाेता. त्याअनुषंगाने संबंधित व्यक्तीची चाैकशी केली असता. एकाकडून खात्रीशिर माहिती मिळताच संशयित आराेपीला पकडण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT