Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale  saam tv
महाराष्ट्र

Udayanraje vs Shivendraraje : भांडणं झाली तर... उदयनराजेंचा इशारा; शिवेंद्रराजे घटनास्थळी दाखल; कार्यकर्त्यांत धक्काबुक्की (पाहा व्हिडिओ)

आज सकाळी नऊ वाजता उदयनराजे कार्यक्रमस्थळी पाेहचले हाेते.

ओंकार कदम

Satara News : माझ्या प्राॅपर्टीत काेणी पाय ठेवायचा नाही. माझ्या प्राॅपर्टीत काेणी गेल्यास त्यांच्यावर ट्रेसपासिंगची केस ठाेकणार. तुम्ही सगळ्यांना नीट समजावून सांगा भांडण झाली तर माेठी हाेतील असे खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांनी पाेलिसांना खिंडवाडीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर केले. दरम्यान हे काेणत्या टाेकाला जाईल मी सांगू शकत नाही असा इशारा देखील उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांना दिला. (Maharashtra News)

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापुर्वी (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) काही ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या घटनास्थळी पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. या घटनेच्या वेळीस खासदार उदयनराजे भाेसले हे देखील घटनास्थळी पाेहचले. या घटनेमुळे साता-याच्या दाेन्ही राजांमध्ये (उदयनराजे Udayanraje Bhosale आणि शिवेंद्रराजे Shivendraraje Bhosale) यांच्यात आगामी काळात खडाजंगी हाेण्याची चिन्ह निर्माण झाली हाेती.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे घटनास्थळी पाेहचल्यानंतर त्यांनी काेठे भूमिपूजन करायचे आहे असे समर्थकांना विचारलं. त्यानंतर आणा नारळ असे म्हणत त्यांनी भूमिपूजनाची तयारी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी सुरु केली.

पाेलिसांचे शांततेचे आवाहन

दरम्यान घटनास्थळी दाेन्ही गटात धक्काबूक्की देखील झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पाेलिसांनी दाेन्ही गटास शांतता राखण्याचे आवाहन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT