Breaking Satara : विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात केले अंत्यसंस्कार ओंकार कदम
महाराष्ट्र

Breaking Satara : विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात केले अंत्यसंस्कार

साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावातली एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर राडा केल्याने तणाव निर्माण झाला होता.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावातली एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर राडा केल्याने तणाव निर्माण झाला होता. मयुरी चंद्रशेखर शिंदे असे त्या विवाहितेचे नाव असून चार वर्षा पूर्वी मयुरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा असून कोपर्डे येथील हे दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरातच्या नवसारी येथे नोकरी निमित्ताने राहत होते.

हे देखील पहा :

गुजरात आणि कोपर्डे येथे वारंवार होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन गुजरात येथे आत्महत्या केली होती. यानंतर आत्महत्या केलेल्या विवाहितेचा अंत्यविधी माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच केल्याने तणाव निर्माण झाला. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यस्थी करत प्रकरण हाताळल्याने तणावावर नियंत्रण मिळवता आले.

याप्रकरणी सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरे उत्तमराव शिंदे सासु बेबी शिंदे, आत्महत्या केलेल्या विवाहितेचा नवरा चंद्रशेखर शिंदे, दिर प्रशांत शिंदे, नणंद संगीता भोसले, स्वाती काकडे, मंगल कदम यांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT