Satara Karad accident Eicher and two wheeler accident Saam Tv News
महाराष्ट्र

Satara Accident : दुचाकीवरुन जाताना काळाची झडप, आयशर टेम्पोच्या चाकाखाली आले, दोन तरुणींना चिरडलं; जागीच मृत्यू

Satara Karad Accident : आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवती जागीच ठार झाल्या आहेत. करिष्मा कळसे आणि पूजा कुऱ्हाडे असं अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत.

Prashant Patil

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात डी मार्टमधील दुचाकीवर असणाऱ्या दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवती जागीच ठार झाल्या आहेत. करिष्मा कळसे आणि पूजा कुऱ्हाडे असं अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत. अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.

दुर्दैवी घटनेत मुलीचा मृत्यू

वडील दूध वाटपाचा व्यवसाय करायचे. त्यांना हातभार म्हणून मुलगी देखील मदतीस उभी राहायची. दरम्यान वडिलांचा अपघात झाल्याने त्यांना दुचाकी चालविणे शक्य नव्हते. यामुळे सर्व जबाबदारी मुलीने घेतली. मात्र दुर्दैवाने दूध वाटप करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे.

अमळनेर तालुक्यातील लोंढवे शिवारात १२ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर- धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्याच्या पुढे अपघात घडला. यात भाग्यश्री दीपक पाटील (वय २२) असे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रहिवासी असलेली भाग्यश्री पाटील ही वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती. मोटर सायकलवरून दुधाचे कॅन बांधून एकटी दूध वाटपासाठी जात होती.

दरम्यान, दूध वाटपासाठी गेलेल्या दीपक पाटील यांचा दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून अपघात झाला होता. यामुळे डॉक्टरांनी त्यांना दुचाकी चालविण्यास मनाई केली होती. त्यामुळे मुलगी भाग्यश्री हिने सर्व जबाबदारी सांभाळत दूध ने आण करणे तसेच वाटप करण्याचे काम करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

Crime: तरुणाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, चिमुकल्यासमोरच पाईपने मारहाण करत संपवलं; बीडमध्ये खळबळ

Shubman Gill: शुभमन गिलची ट्रिपल सेंच्युरी हुकली; मात्र विराट कोहलीचा महारेकॉर्ड मोडला, गावस्करांनाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT