Satara News update  Saam tv
महाराष्ट्र

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Satara News update : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल झाल्याचे समोर आले. या प्रकरणाच्या पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर आलीये.

Akshay Badve

साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे समोर

आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेचे आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरला फोन

डॉक्टर महिला गेल्या ८ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात वास्तव्याला

सायबर तज्ञांकडून डॉक्टर महिलेच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप डेटा रिट्रीव्ह करण्याची प्रक्रिया

साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाने खळभळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासात अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे. डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपाळ बदने आणि पीडित महिलेचे घर मालक प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस तपासात महत्वाची माहिती समोर आलीये.

डॉक्टर महिलेतील दोन्ही आरोप फरार असल्यामुळे पोलिसांच्या २ पथकांकडून शोध सुरु आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॉक्टर महिलेचे प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्याशी अनेकदा फोन कॉल झाल्याचंही समोर आलंय. या प्रकरणातील इतरही मुद्दे समोर आले आहेत.

पोलीस तपासात काय समोर आलं?

डॉक्टर महिला गेल्या ८ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाडेकरू होत्या. बनकर यांच्या आई त्यांना जेवणाचा डबा देत होत्या. २३ तारखेला पहाटे १.३० वाजता डॉ संपदा मुंडे यांनी फलटण येथील हॉटेल मधूदीपमध्ये चेक इन केलं.

डॉक्टर महिलेकडून हॉटेलची रूम २ दिवसांसाठी बुक केली. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना डॉक्टर महिलेसोबत कोणी नव्हतं. डॉक्टर महिलेचं पी एस आय बदने आणि बनकर यांच्यात अनेक कॉल झाले.

दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे २३ तारखेला संध्याकाळी ४ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले. पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या हाताची मूठ उघडल्यानंतर हातावर लिहिलेला मजकूर समोर आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले. तर मृत्यूपूर्वी कुठल्याही जखमा किंवा व्रण शरीरावर नसल्याचे स्पष्ट झाले.

आत्महत्यापूर्वी डॉक्टर महिलेचा बनकरला कॉल

मूळच्या बीड जिल्ह्याच्या डॉक्टर या प्रशांत बनकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून ८ महिन्यापासून राहत होत्या. डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारीपासून १५८ पेक्षा अधिक कॉल झाले. आत्महत्यापूर्वी डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल झाला. व्हॉट्सॲप कॉल डिलिट केल्यामुळे डॉक्टर महिलेच्या मोबाईलमधील मेसेज रिट्रीव करण्याची प्रक्रिया सायबर तज्ञांकडून सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसकडून अजित पवार गटाला जबरदस्त धक्का! बड्या नेत्यासह २३ जण हाती घड्याळ बांधणार

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

Pune : म्हाडा कॉलनीत वरिष्ठ लिपिकाची आत्महत्या, पुण्यात खळबळ

Shocking : धक्कादायक! लिफ्ट दिली अन् कैद केलं, विद्यार्थिनीवर ४ दिवस सामूहिक बलात्कार

Ek Deewane Ki Deewaniyat OTT : हर्षवर्धन राणेचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT