satara court Saam Tv
महाराष्ट्र

Satara Crime News: १४ काेटींचा अपहार, १८ जणांचा अटकपुर्व जामीन फेटाळला; पुण्यातल्यांचाही समावेश

दरम्यान संबंधित संशयितांनी अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी सातारा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत १३ काेटी ६४ लाख ७१ हजार ८७६ रुपयांच्या चाेरीसह भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सातारा आणि पुण्यातील १८ रहिवाशांनी दाखल केलेला अटकपुर्व जामीन अर्ज नुकताच सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने (satara district court) फेटाळला आहे. विशेष म्हणजे या संशयित आराेपींपैकी काही जण कंपनीचे भागदारक तसेच कामगार आहेत. (satara district and session court rejected anticipatory pre arrest bail of 18 citizens from satara and pune latest marathi news)

युटाेपिया कंपनीचे प्रमुख प्रसन्न देशमुख यांनी सातारा (satara) सिटी पाेलिस ठाण्यात सुमारे दीड महिन्यांपुर्वी तक्रार दिली हाेती. फसवणुकीचा तपास सध्या सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे पाेलिस अधिकारी करीत आहेत. फिर्यादी प्रसन्न देशमुख व संशयित आराेपी महेश साखळकर हे कंपनीचे भागिदार आहेत. देशमुख यांचे ७५ टक्के शेअर्स असून साखळकर यांनी अन्य संशियत आराेपींशी संगनमत करुन कंपनीचा अधिकृत लाेगाेचे डिझाईन चाेरले. याबराेबरच कंपनीस आर्थिक ताेटा हाेईल अशा विविध गाेष्टी केल्या.

याबाबत देशमुख यांनी १४ काेटींचे नुकासन झाल्याची तक्रार पाेलिसांत दिली. संबंधित गुन्ह्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेस वर्ग झाला आहे. दरम्यान संबंधित संशयितांनी अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी सातारा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला हाेता.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या समाेर झाली. यावेळी मिलींद ओक, शिवराज धनवडे आणि राज साळूंखे या वकीलांनी केलेला युक्तीवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरला.

१८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान न्यायालयाने (satara court) महेश साखळकर, नितीन गायकवाड, तन्मय रणशिंग, अनिरुद्ध देसाई, अभय सपाटे, तुषार कदम, समीर वाघ, नितीन चिकुर्डे, अनिकेत बाेबडे, धनंजय कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, देवदत्त काणे, सार्थक पालकर, साै. किरण पालकर, साै. जागृती साखळकर, शुभम यादव, विकास माेरे, दिनेश फलक या १८ जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT