Udayanraje Bhosale elected unopposed in Satara DCC Bank election saam tv
महाराष्ट्र

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा बिनविरोध बाजी मारलीय. विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची निवड झाली.

Bharat Jadhav

  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

  • उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

  • उदयनराजेंच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी मागे घेतली.

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज एक महत्त्वाची घडामोड घडलीय खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. गृहनिर्माण आणि दूध संस्था यांमधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात संचालकपदासाठी अर्ज दाखल केलेले ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर छत्रपतींच्या गादीचा सन्मान आणि आदर म्हणून आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले.

या बिनविरोध निवडीनंतर उदयनराजे समर्थकांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजे यांचे बुके देऊन स्वागत केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी 236 पैकी 224 अर्ज शिल्लक वैद्य राहिले आहेत. मात्र उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. खासदार उदयनराजे भोसले हे दुसऱ्यांदा सातारा जिल्हा बॅंकेवर निवडून आलेत. या दोन्ही वेळा त्यांनी गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून बिनविरोध बाजी मारलीय.

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत आणि तालुक्यांत अनेक सहकारी संस्था लिक्विडेशनमध्ये निघाल्या आहेत. यामागील मूळ कारण राजकारण आहे. सरकारी चळवळ "लोकांनी, लोकांसाठी" या तत्त्वावर सुरू झाली होती, पण त्याचा विसर पडत चालला आहे. आपली जिल्हा बँक नावारूपाला आली असून तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. इतर बँकांसारखी तिची अवस्था होऊ नये आणि या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा व्हावी, हाच आपला उद्देश आहे.

या बँकेत आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा किंवा वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ सर्वसामान्य माणसांची प्रगती आणि उत्कर्ष व्हावा, हीच आपली भूमिका असल्याचं खासदर उदयनराजे भोसले म्हटलंय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, तो वेगळा भाग असून निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, याचा निर्णय शासन पातळीवर घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात १० टक्के पाणीकपात! शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय; दिवाळीआधी मिळणार मदत?

Silk Saree For Womens: महिलांसाठी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स तुम्हाला नक्की आवडतील

Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची संचालकपदी बिनविरोध निवड

Badlapur news : बदलापूर नगरपालिकेत आला अनोळखी पाहुणा; कर्मचाऱ्यांची उडाली दाणादाण , नेमक काय घडलं?

SCROLL FOR NEXT